Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:00 IST

साई पल्लवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

साई पल्लवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. साई पल्लवी आज ९ मे रोजी आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. साई चित्रपटांबरोबच तिच्या लव्हलाईफमुळेही चर्चेत असते. तुम्हाला माहितेय का साईनं सातवीत असताना एका मुलासाठी घरच्यांचा मार खाल्ला होता. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तो किस्सा जाणून घेऊया...

साई पल्लवीचा जन्म तामिळनाडूच्या कोटागिरी येथे झाला होता. साईच शिक्षण हे वैद्यकशास्त्रात झालं आहे. लहानपणापासून साई ही अभ्यासात हुशार होती. पण, साईला आयुष्यात एकदा घरच्यांना चांगलाच मार खावा लागला होता.  साईनं सातवीत असताना एका मुलासाठी प्रेमपत्र लिहलं होतं. पण ते पत्र मुलाला देण्याआधीच तिच्या घरच्यांच्या हाती लागलं. यामुळे तिला खूप मार पडला होता. ही गोष्ट खुद्द अभिनेत्रीने सांगितली होती. यानंतर आपण पुन्हा कधी प्रेमपत्र लिहण्याच धाडस केलं नाही, असं तिनं सांगितले. 

साई पल्लवीनं आपल्या अभिनयाची सुरुवात ही "प्रेमम" या चित्रपटापासून केली होती. पण, खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं. यासाठी ती जॉर्जियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. जेव्हा 2014 मध्ये सुट्टीमध्ये  ती भारतात आली. तेव्हा तिला "प्रेमम" या सिनेमासाठी विचारण्यात आलं. यावर साई पल्लवीने होकार कळवला आणि सुट्टीमध्ये ती या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून आपल्या वैद्यकीय  शिक्षणासाठी जॉर्जियाला परतली. तिचा पहिलाच सिनेमा हा हीट ठरला. या चित्रपटासाठी तिला साऊथचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, त्यानंतर साई पल्लवीने मागे वळून पाहिले नाही.

साई पल्लवी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीनही आहे.  साई पल्लवीच्या मते जे नैसर्गिक आहे तेच खूप सुंदर आहे.  म्हणून ती कोणत्याही चित्रपटात मेकअप न करताच भूमिका साकारते. तसेच तिनं साई पल्लवीला दोन कोटी रुपयांची एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. यामुळे तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. सई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

टॅग्स :साई पल्लवीसेलिब्रिटीTollywood