Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिअल सुपरहिरो! फॅनच्या मृत्यूनंतर साऊथ स्टार सूर्याने घेतली कुटुंबीयांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:07 IST

Suriya: सूर्याच्या एका चाहत्याचं रस्ते अपघातात निधन झालं. याविषयी सूर्याला कळताच त्याने त्याच्या कुटुंबीयांकडे धाव घेतली.

दाक्षिणात्य कलाविश्वातील कलाकार त्यांच्या उत्तम अभिनयासह नम्रपणामुळेही कायम चर्चेत असतात. आतापर्यंत साऊथ स्टार आणि त्यांच्या चाहत्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत जे पाहून या कलाकारांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असाच एक किस्सा पुन्हा एकदा घडला आहे. साऊथ स्टार सूर्या (Suriya) याच्या एका चाहत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या चाहत्याच्या घरी जाऊन सूर्याने त्याच्या आई-वडिलांचं सांत्वन केलं आहे.

अभिनेता सूर्या कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी त्याच्यातील नम्रपणामुळे. विशेष म्हणजे सूर्या कायम त्याच्या चाहत्यांना आपल्या कुटुंबियांप्रमाणे वागवतो. त्यामुळे कोणत्याही चाहत्याला तो फारसं नाराज करताना दिसत नाही. परंतु, यावेळी त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

काही दिवसांपूर्वीच सूर्याच्या एका चाहत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या चाहत्याच्या मृत्युची माहिती सूर्याला मिळताच त्याने लगोलग या चाहत्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या आई-वडिलांचं सांत्वन केलं. हा प्रसंगाचे काही फोटो सूर्याच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान, सूर्या सध्या 'कंगुवा' या सिनेमाचं शूट कर आहे. या सिनेमात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमानंतर तो 'सूर्या 43' या सिनेमाच्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. इतकंच नाही तर येत्या काळात त्याचे 'वेत्रिमारन' आणि 'इरुम्बु काई मायावी' हे सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमा