Join us

बॉलिवूड नाही तर साउथ सिनेसृष्टीतून कमबॅक करणार 'देसी गर्ल', ६ वर्षांपूर्वी केलेला हिंदी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:08 IST

हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली प्रियंका चोप्रा आता साउथमध्ये झळकणार आहे.

'देसी गर्ल'प्रियंका चोप्रा काही वर्षांपूर्वीच परदेशात स्थायिक झाली. सध्या प्रियंका पती निक जोनास आणि लेक मालतीसह अमेरिकेत राहते. मध्येच ती काही कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी भारतात येते. प्रियंका २०१९ साली 'द स्काय इज पिंक' या हिंदी सिनेमात दिसली. नंतर अजून तिने एकही हिंदी सिनेमा केलेला नाही. दरम्यान प्रियंका सध्या हैदराबादमध्ये असून ती दाक्षिणात्य सिनेमातून कमबॅक करत आहे.

हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली प्रियंका चोप्रा आता साउथमध्ये झळकणार आहे. एस एस राजमौली यांच्या SSMB29 या सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात प्रियंका पहिल्यांदाच सुपरस्टार महेश बाबूसोबत झळकणार आहे. प्रियंकालाही भारतीय सिनेमात कमबॅक करायचंच होतं. पण यासाठी तिने हिंदी नाही तर साउथ निवड केली आहे. 

हैदराबादमध्ये ग्रँड इव्हेंट

SSMB29 या सिनेमासाठी प्रियंका अनेकदा भारतात येत असते. १५ नोव्हेंबर ला सिनेमाचं टायटल आणि पहिली झलक समोर येणार आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या इव्हेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रियंकाला या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान प्रियंका 'लव्ह अँड वॉर'मध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे. संजय लीला भन्साळींनी तिला एका डान्सनंबरसाठी अप्रोच केलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra to comeback in South Indian cinema, not Bollywood.

Web Summary : Priyanka Chopra, settled abroad, returns to Indian cinema with SSMB29 alongside Mahesh Babu. Her last Hindi film was in 2019. The film's title reveal event is in Hyderabad. Possible appearance in Sanjay Leela Bhansali's film too.
टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडTollywood