Join us

'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 17:07 IST

'पथेर पांचाली' सिनेमात दुर्गाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन झालंय (uma dasgupta)

'पथेर पांचाली' या क्लासिक बंगाली सिनेमात दुर्गाची भूमिका साकारणारी अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन झालंय. त्या ८४ वर्षांच्या होत्या. उमा यांनी गाजलेल्या 'पथेर पांचाली' सिनेमात दुर्गाची भूमिका साकारली. 'पथेर पांचाली' सिनेमातील दुर्गाची भूमिका प्रचंड गाजली. उमा यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. उमा यांचे चाहते  आणि मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

उमा दासगुप्ता काळाच्या पडद्याआड

१९५५ साली आलेला 'पथेर पांचाली' सिनेमा आजही क्लासिक  सिनेमा म्हणून ओळखला जातो. सत्यजित रे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही या सिनेमाच्या विषयावर चर्चा केली जाते. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोललं जातं. या सिनेमात उमा यांनी दुर्गा रॉय ही भूमिका साकारली होती. उमा यांनी साकारलेली दुर्गाची भूमिका आजही सिनेप्रेमींच्या स्मरणात आहे. उमा यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातील तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

उमा दासगुप्ता बंगाली सिनेमाची शान

उमा गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांनी कोलकाता येथील एका इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. उमा यांच्या कुटुंबाने ही दुःखद वार्ता सर्वांना सांगितली. उमा यांनी बंगाली सिनेसृष्टीसाठी दिलेलं योगदान नावाजलं जातं. बंगाली सिनेमे पाहण्यासाठी लोकांना थिएटरमध्ये भाग पाडायला सत्यजित रे यांच्यासोबत उमा दासगुप्ता यांचाही मोठा वाटा आहे.

टॅग्स :Tollywoodबॉलिवूड