Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:00 IST

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत बिकिनी घातल्याचा फायदा झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

नयनतारा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, करिअरच्या सुरुवातीला तिला ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. नयनताराला बिकिनी घातल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत बिकिनी घातल्याचा फायदा झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. 

सध्या नयनतारा तिच्या 'नयनतारा : बीयाँड द फेरीटेल' या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. यामधून तिने सिनेविश्वातील करिअर बाबतीत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिने गजनी सिनेमाला तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ म्हटलं आहे.  या सिनेमामुळे तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. "गजनी हा माझ्या कारकीर्दितील सगळ्यात वाईट चित्रपट आहे. ही खूप जाड आहे, ही सिनेमात का काम करतेय? अशा कमेंट तेव्हा मी वाचल्या आहेत. तुम्ही अशा गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत. तुम्ही अभिनयाबद्दल बोललं पाहिजे. मी कदाचित चांगलं काम केलं नसेल. पण, माझ्या दिग्दर्शकाने जे सांगितलं तेच मी केलं. त्याने जे कपडे घालायला सांगितले मी तेच घातले. मी इंडस्ट्रीत नवीन होते. ", असं नयनतारा म्हणाली. 

२००७ साली प्रदर्शित झालेल्या 'बिल्ला' सिनेमात नयनताराने बिकिनी घातल्यामुळेही तिला ट्रोल केलं गेलं होतं. याबाबतही तिने भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, "या सिनेमातीला बिकिनी सीनमुळे खूप मोठा ड्रामा झाला होता. त्या सीनचा अनेकांना प्रॉब्लेम होता. पण, मला वाटतं यामुळेच अनेक गोष्टी बदलल्या. मला काही सिद्ध करण्यासाठी मी ते केलं असं नाही. मी ते केलं कारण, माझ्या दिग्दर्शकाने असा सीन आहे असं सांगितलं. आणि ते गरजेचंही होतं, म्हणून मी केलं. पण, या गोष्टीचा मला फायदाच झाला". 

नयनताराने २००३ साली मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने हिंदी, तमिळ, तेलुगुमध्येही काम केलं आहे. सध्या नयनतारा ही साऊथमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

टॅग्स :नयनताराTollywoodसेलिब्रिटी