Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाबाबत महिला मंत्र्याचं आक्षेपार्ह वक्तव्य, नागा चैतन्य भडकला, समांथाचा उल्लेख करत म्हणाला- "माझी EX पत्नी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:28 IST

तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा आणि समंथाच्या घटस्फोटाला बीआरएस प्रेसिडेंट केटी रामा जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना जबर धक्का बसला होता. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांनी नागा चैतन्य आता पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशातच तेलंगणाच्या महिला मंत्र्याने त्यांच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा आणि समंथाच्या घटस्फोटाला बीआरएस प्रेसिडेंट केटी रामा जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

नागा चैतन्यची पोस्ट 

घटस्फोट हा कोणाच्याही आयुष्यातील सगळ्यात दुर्देवी आणि दु:खद निर्णय असतो. खूप विचार केल्यानंतर मी आणि माझ्या एक्स पत्नीने सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. योग्य समज असलेल्या दोन व्यक्तींनी आयुष्याची वेगळी ध्येय आणि आवड लक्षात घेऊन अगदी शांततेत आणि आदरपूर्वक हा निर्णय घेतला होता. याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा या निराधार आहेत. माझे कुटुंबीय आणि एक्स पत्नी यांचा आदर म्हणून मी यावर मौन बाळगलं होतं. 

 

आज मंत्री कोंडा सुरेखा यांनी आमच्या घटस्फोटाबाबत केलेलं वक्तव्य हे केवळ खोटच नसून अत्यंत हास्यास्पद आणि अस्वीकार्ह आहे. महिलांना पाठिंबा आणि आदरपूर्वक वागवलं गेलं पाहिजे. चर्चेत येण्यासाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी वक्तव्य करणं हे लज्जास्पद आहे. 

काय म्हणाल्या कोंडा सुरेखा? 

नागार्जुनच्या एन कन्वेन्शन सेंटरला तोडलं जाणार नाही त्याबदल्यात समंथाला त्यांनी आपल्याकडे पाठवावं अशी मागणी केटी रामा राव यांनी नागार्जुनकडे केली होती असा दावा कोंडा सुरेखा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केटी रामा राव यांना अभिनेत्रींचं शोषण करण्याची सवय आहे. त्यांनी अनेक अभिनेत्रींना ड्रग्सची सवय लावली आणि त्यांचा फोन टॅप केला. याचाच फायदा घेत ते अभिनेत्रींना ब्लॅकमेल करायचे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodघटस्फोट