Join us
Daily Top 2Weekly Top 5

तृषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं मंसूर अली खानला पडलं महागात, अभिनेत्रीची मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 10:50 IST

मंसूर अली खानवर तामिळनाडूतील नुंगमबक्कममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती.

मंसूर अली खानने तृषाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सध्या चांगलाच वादंग निर्माण झाला होता.  थलापती विजयच्या 'लिओ' सिनेमात मंसूर अली खान आणि तृषाही झळकले आहेत. यामध्ये तृषाबरोबर एक सीन करण्याबाबत मंसूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही.  परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही", असं मंसूर अली खान म्हणाला होता.

या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) घेतली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. प्रकरण इतकं तापलेलं असतानाही मंसूर अली खान याने त्याची चूक अद्यापही कबूल केली नव्हती. मंसूर अली खानवर तामिळनाडूतील नुंगमबक्कममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती. 

यानंतर मंसूर अली खानने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली. सर्व वादानंतरही मन्सूरने त्रिशाची माफी मागण्यास नकार दिला. मात्र, आता त्याचा सूर बदललेला दिसतोय.

मंसून अली खानने अखेर तृषा कृष्णनची माफी मागितली आहे. रमेश बालाच्या माध्यमातून X वर केलेल्या पोस्टमध्ये मन्सूरचे विधान असे आहे की, 'माझी सहकलाकार तृषा, कृपया मला माफ करा. देव मला तुझ्या लग्नाला आशीर्वाद देण्याची संधी देऊ दे.  ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

टॅग्स :Tollywoodसिनेमा