Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तो मला मारायचा अन्....' प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप; तर अभिनेत्यानेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:51 IST

अभिनेत्रीने रेडिओला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा, नेटकऱ्यांमध्ये दिग्दर्शकाविरोधात नाराजी

मल्याळम अभिनेत्री ममिता बैजूने (Mamita Baiju) दिग्दर्शक बालावर (Bala) गंभीर आरोप लावले आहेत. ममिता आधी त्यांच्यासोबत 'वनंगान' सिनेमात काम करत होती. पण तिने मध्येच सिनेमा सोडला. बाला सेटवर तिला मारायचे आणि सगळ्यांसमोर जोरजोरात ओरडायचे असे आरोप तिने लावले आहेत. 'वनंगान' सिनेमात ती मुख्य अभिनेत्री होती. तर सूर्या हा लीड हिरो होता. नंतर दोघांनीही सिनेमा मध्येच सोडला.

सूर्या ने फिल्म सोडण्यामागचं कारण म्हणजे बालासोबत त्याचा क्रिएटिल डिफ्रन्स आहे. तर ममिताने दिग्दर्शकावर छळाचे आरोप लावून सिनेमा सोडला. तिने रेडिओ एफएमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "सिनेमात विलादिचम्पातु हा नृत्यप्रकार आहे. ते पाहून मी विचारलं की माझं कॅरेक्टर या नृत्याची बऱ्याच काळापासून प्रॅक्टिस करत आहे का की ती पहिल्यांदाच हे करत आहे?  तेव्हा मला सांगण्यात आलं की माझ्या पात्राला व्यापक अनुभव आहे. त्यामुळे मी यात तरबेज दिसली पाहिजे ना? कारण परफॉर्म करताना ड्रम वाजवत गायचं असतं आणि हे एका खास अंदाजात असतं."

ती पुढे म्हणाली, "त्यानंतर बालाने माझ्यासमोर एका महिलेला आणले जी या प्रकारात तरबेज होती. ती कशी परफॉर्म करते हे मला पाहायला सांगितले. काीच वेळात बालाने घोषणा केली की चला टेक घेऊ. मला कळलंच नाही की इतक्या लवकर मी हे कसं शिकणार होते आणि शॉट देणार होते? मला तर ते काय  गात आहेत हेही कळत नव्हतं. मी तीन वेळा प्रयत्न केला. तेव्हा बाला माझ्यावर ओरडायला लागला. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की ते अशाच पद्धतीने सेटवर असतील. कितीही वाईट बोललो तरी मनाला लावून घेऊ नको असा सल्ला त्यांनी मला दिला होता. म्हणून मी पण मानसिकरित्या तयार होते. ते मला मारायचे देखील. सूर्या सरांनी आधी त्यांच्याबरोबर काम केलंय त्यामुळे त्यांनाही आधीच माहित होतं. पण मला ते असह्य झालं आणि मी सिनेमातून बाहेर पडले."

ममिताच्या या खुलाश्यानंतर युजर्स दिग्दर्शकावर चांगलेच नाराज आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिग्दर्शकाला खडेबोल सुनावले आहेत. तर ममिता बैजू नुकतीच 'प्रेमलू' सिनेमात झळकली.

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodसिनेमा