Join us

कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण? शाळेतील प्रेम ते आयुष्यभराची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:01 IST

जाणून घेऊया कीर्ती सुरेशच्या नवऱ्याबद्दल.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, काही दिवसांपूर्वीच नागा अर्जुन आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह झाला. आता साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेशनेही तिचा प्रियकर अँथनी थैटिलसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

कीर्ती सुरेशने गोव्यात दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नाचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. चाहते कीर्ती सुरेशच्या नवऱ्याबद्दल जाणूनही घेण्यास उत्सुक आहेत. तिचा नवरा कोण आहे आणि काय करतो हे जाऊन घेण्यास चाहते आतुर झाले आहेत. चला जाणून घेऊया कीर्ती सुरेशच्या नवऱ्याबद्दल.

कीर्ती सुरेशच्या पतीचा फिल्मी जगाशी कुठलाही संबंध नाही. कोचीमध्ये जन्मलेला अँथनी थैटिल हा दुबईस्थित उद्योजक आहे. त्याची कोचीमध्ये रिसॉर्ट चेन आहे आणि चेन्नईमध्येही एक कंपनी आहे. उद्योगजगताशी संबंधित असलेल्या अँथनीला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. त्याचं इंस्टाग्राम प्रोफाइल देखील खाजगी आहे.

 क्रिती आणि अँथनी यांची प्रेमकहाणी त्यांच्या शालेय दिवसांपासून सुरू झाली होती आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये खूप छान बाँडिंग आहे. गेल्या 15 वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण, अभिनेत्रीनं आपलं नातं बऱ्याच दिवसांपासून सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. अखेर गेल्या नोव्हेंबर महिन्यात तिनं चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला. 

कीर्ती ही चित्रपट निर्माते जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका सुरेश यांची मुलगी आहे. कीर्तीने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत तिने अनेक सुपरहीट सिनेमे केले आहेत. तामिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर आता कीर्ती वरुण धवनसोबत 'बेबी जॉन'मधून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ॉ 

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodलग्न