Join us

साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 21:27 IST

Jai Hanuman Movie : या सुपरहिट चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 350 कोटींची कमाई केली होती.

Jai Hanuman Movie : गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'हनुमान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. तेलुगूमध्ये बनलेला हा चित्रपट देशभरात अनेक ठिकाणी हाऊसफूल झाला. प्रशांत वर्मा यांनी याचे दिग्दर्शन केले होते. दरम्यान, आता या सुपर हिरो चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. 'जय हनुमान' असे या चित्रपटाचे नाव आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटात हनुमानाची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न विचारला जात होता. पण, आता अखेर याचे उत्तर मिळाले आहे. 

ऋषभ शेट्टी साकारणार हनुमानाची भूमिका'कंतारा' चित्रपटातून पॅन इंडिया ओळख निर्माण करणारा कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. मैत्री मूव्ही मेकर्सनी त्यांच्या एक्स हँडलसह चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. 

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसतोय. त्याने हनुमानाचा इतका हुबेहूब मेकअप केला की, त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. 'जय हनुमान' हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवला जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे तीन भाग येणार आहेत. दरम्यान, ऋषभ शेट्टीशिवाय या चित्रपटात आणखी कोण कोण असेल, याची माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेदेखील अद्याप कळलेले नाही.

 

टॅग्स :Tollywoodबॉलिवूड