Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला खूप त्रास व्हायचा, मी रडायचे, पण..."; श्रीलीलाने ट्रोलिंगविषयी सांगितली 'ती' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:39 IST

Sreeleela: सुरुवातीच्या काळात ट्रोलिंग झाल्यावर श्रीलीलाची अवस्था कशी व्हायची हे तिने सांगितलं.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला (sreeleela) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तेलुगू इंडस्ट्रीत हक्काचं स्थान मिळवणारी श्रीलीला लवकरच ‘उस्ताद भगत सिंग’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती अभिनेता पवन कल्याणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल करावा लागला. अनेकदा तिला ट्रोलिंगचा समाना करावा लागला. या ट्रोलिंगविषयी तिने नुकतंच तिचं मत मांडलं आहे.

श्रीलीलाने अलिकडेच सुमा कनकवाला यांच्या ‘द रील फ्लेवर’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सुरुवातीच्या काळात ट्रोलिंग झाल्यावर तिची अवस्था कशी व्हायची हे सांगितलं.

''जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते. तेव्हा मला या ट्रोलिंगचा खूप त्रास व्हायचा. मला प्रचंड वाईट वाटायचं आणि मी रडायचे. मला हे सगळं जमणार नाही, असं मी सतत माझ्या आईला म्हणायचे. त्यामुळे मी परत शाळेत किंवा कॉलेजला जाऊ का? असंही विचारायचे. मी फार भावनिक होते. परंतु, आता मला या ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही'', असं श्रीलीला म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''सुरुवातीला माझ्या मनात सतत इंडस्ट्री सोडायचा विचार यायचा. पण, जसजशी वेळ पुढे सरकत गेली. मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मला वाटते की, आजकालच्या लोकांमधील विचारसरणी आता बदलली आहे. नकारात्मकता दिसली की ते त्या गोष्टीचा कमी विचार करतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता लोक जास्त शहाणी झाली आहेत. म्हणूनच, ते योग्य गोष्टींचा विचार करतात.''

दरम्यान,  ती ‘उस्ताद भगत सिंग’ या सिनेमा बरोबरच ती एका बॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.  सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘आशिकी 3’ असे असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता या चित्रपटाचं नवीन नाव ‘तू मेरी जिंदगी है’ असे ठेवण्यात आलं आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Sreeleela opens up about trolling and her emotional struggles.

Web Summary : Actress Sreeleela discussed facing severe trolling early in her career. Initially heartbroken, she considered leaving the industry. Over time, she learned to ignore negativity and will appear in Bollywood film 'Tu Meri Zindagi Hai' with Kartik Aaryan.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमापवन कल्याण