Join us

अल्लू अर्जुनचा जबरा फॅन, एका भेटीसाठी UP ते हैद्राबाद सायकलवरून केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 09:52 IST

अल्लू अर्जूनचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं अभिनय, त्यांची स्टाइल यांची भुरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असल्याचं पहायला मिळतं.

सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अल्लू अर्जुनचा मोठा चाहता वर्ग आहे. अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी त्यांचे चाहते हैदराबादमधील घराबाहेर मोठी गर्दी करत असतात. अशातच अल्लू अर्जुनचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी थेट उत्तर प्रदेशवरून हैदराबादमध्ये आला. 

विशेष गोष्ट म्हणजे हा चाहता उत्तर प्रदेशमधील अलीगढवरुन कारने, बसने किंवा विमानाने आला नाही तर तो चक्क सायकल चालवत हैद्राबादमध्ये पोहचला.  1600 किलोमीटरचा हा प्रवास त्याने सायकलने पार केला. अभिनेत्यानेही या चाहत्याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटोही क्लिक केले.अल्लू अर्जुनच्या या जबरा फॅनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

अल्लू अर्जुन  आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की,अल्लू अर्जुन  काळ्या रंगाचा टी-शर्टमध्ये दिसत आहे. तर त्याच्यासोबत उभा असलेली व्यक्ती त्याचा जबरा फॅन आहे. अल्लू अर्जूनने चाहत्याची भेट घेतलीच. त्याच्याशी गप्पा मारून फोटोही काढले. 

अल्लू अर्जून आणि चाहत्यांच्या गोड भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अल्लू अर्जून कितीही मोठा सुपरस्टार असला तरी देखील त्याची जमिनीशी नाळ जोडलेली आहे. अनेकदा तो असं काही करून जातो की सगळ्यांचे लक्ष वेधलं जातं. अल्लू अर्जूनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'पुष्पा २: द रुल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :अल्लू अर्जुनहैदराबादपुष्पा