बहुप्रतिक्षित ॲक्शन-मायथोलॉजिकल चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रभावित केले असून, काही चाहत्यांनी तर अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) आणि चित्रपटाप्रती आपलं प्रेम दर्शवण्यासाठी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच एका प्रेक्षकाचा थिएटरबाहेरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत?
'कांतारा' पाहून चाहत्याला भावना अनावर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये 'कांतारा चॅप्टर १' पाहिल्यानंतर एक चाहता सिनेमा हॉलच्या बाहेर वेगळ्याच अवस्थेत दिसत आहे. धोतर-कुर्ता घातलेला हा चाहता मोठ्याने ओरडत आहे, जणू काही त्याच्यात पंजुर्ली देवाचा संचार झालेला दिसतोय. सिनेमा पाहून भारावून गेलेल्या या चाहत्याने थेट जमिनीवर साष्टांग दंडवत घालत चित्रपटाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना देवापेक्षा कमी मानत नाहीत आणि अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारे व्हिडिओ अनेकदा चित्रपट रिलीज झाल्यावर पाहायला मिळतात.
'जबरदस्त सिनेमाटिका अनुभव'
चाहत्याच्या या भावनिक कृतीमुळे ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला असल्याचं स्पष्ट होतंय. या चित्रपटाची प्रशंसा करताना अनेक युजर्सनी 'कांतारा चॅप्टर १' सिनेमाला 'जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव' आणि 'आतापर्यंतचा उत्कृष्ट चित्रपट' असं म्हटलं आहे. ऋषभ शेट्टी यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या 'कांतारा चॅप्टर १' मध्ये बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत आणि अरविंद कश्यप यांची सिनेमॅटोग्राफी आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना एक दमदार आणि भावनिक कथा अनुभवायला मिळत आहे. ऋषभसोबत या सिनेमात रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैय्या प्रमुख भूमिकेत आहेत.
Web Summary : A 'Kantara Chapter 1' fan, overwhelmed, acted as if possessed by Panjurli deity outside a theater. He prostrated, showcasing devotion. Viewers hail the film as a cinematic masterpiece.
Web Summary : 'कांतारा चैप्टर 1' देखने के बाद एक भक्त थिएटर के बाहर पंजुर्ली देवता से प्रेरित होकर व्यवहार करने लगा। उसने साष्टांग प्रणाम किया। दर्शकों ने फिल्म को उत्कृष्ट बताया।