Join us

"काहीही झालं तरी मी...", अनुष्का शेट्टीने लग्नाच्या चर्चांवर सोडलं मौन, कोणाशी लग्न करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:48 IST

अनुष्का शेट्टीने अखेर दिलं उत्तर, प्रभास की दुसरंच कोण?

'बाहुबली' हा मूळचा दाक्षिणात्य सिनेमात जगभरात गाजला. या सिनेमातील भूमिकेमुळे अभिनेता प्रभास ग्लोबल स्टार झाला. तसंच प्रभास आणि अनुष्का शेट्टीची (Anushka Shetty) केमिस्ट्री खूप गाजली. या सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्काच्या चाहतावर्गात कमालीची वाढ झाली. तसंच दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करावं अशी चाहते नेहमीच इच्छा व्यक्त करतात. दोघंही आपापाल्या आयुष्यात अद्याप सिंगल आहेत. आता नुकतंच अनुष्का शेट्टीनेलग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्माचा आगामी 'घाटी' सिनेमा रिलीज होणार आहे. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने लग्नावर भाष्य केलं. ती म्हणाली, "बाहुबली सिनेमानंतर माझ्यावर लग्नासाठी दबाव वाढला आहे. कुटुंबियांकडूनही सतत लग्नासाठी विचारणा होत आहे. माध्यमांमध्येही याच चर्चा सुरु आहेत. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. पण मी योग्य वेळ आली की मगच लग्न करेन."

ती पुढे म्हणाली, "मला लहान मुलं खूप आवडतात. पण मी जोवर कोणाच्या प्रेमात पडत नाही तोवर मला लग्न करायचं नाही. काहीही झालं तरी मी त्याच व्यक्तीशी लग्न करेन ज्याच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या आईवडिलांचंही हेच म्हणणं आहे. योग्य व्यक्ती आणि योग्य वेळेची मी वाट पाहत आहे. मी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कोणाशीही लग्न करणार नाही."

अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत नागार्जुन, रवि तेजा, प्रभास या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. काही काळापासून ती स्क्रीनवरुन गायब होती. म्हणूनच तिच्या लग्नाच्या चर्चांना जोर धरला. मात्र आता ती 'घाटी'सिनेमातून कमबॅक करत आहे. 

टॅग्स :अनुष्का शेट्टीTollywoodलग्नप्रभास