सुपरस्टार अल्लू अर्जूननं मुंबईतील जुहूमध्ये घर घेतलं आहे. रिपोर्टनुसार, हे घर अल्लू अर्जूननं भाड्यानं घेतलं आहे. अल्लू अर्जून समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आलिशान पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहणार आहे. यासाठी तो दरमहा सुमारे १६ लाख रुपये भाडं देणार आहे. हा करार तीन वर्षांसाठी असून हे अपार्टमेंट सुमारे ६,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं आहे. या घराची खासियत म्हणजे समोरचं अप्रतिम समुद्र दृश्य पाहण्यासारखे आहे.
अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डी आणि त्यांची मुलं अल्लू अयान व अल्लू अरहा यांच्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगतच घर असावं, ही त्याची खास इच्छा होती. या घरात प्लंज पूल आणि चार कार पार्किंगची सोयही आहे. या प्रॉपर्टीची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे. स्नेहा रेड्डीने गेल्या वर्षभरात अनेकदा या घराला भेट देत इंटीरियर डिझाइन स्वतः पाहिलं आहे. शांत, हिरवळ असलेलं आणि समुद्राच्या आवाजामुळे रिलॅक्स वाटेल असं घर अल्लू कुटुंबाला हवं होतं. या परिसरात अनेक बॉलिवूड स्टार्सही राहतात. कतरिना कैफ-विकी कौशल आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यासारखी प्रसिद्ध जोडपी याच भागात राहतात.
हैदराबादचं घर कायम
मुंबईत अल्लू अर्जून फक्त कामानिमित्त राहणार आहे. तो हैदराबाद कायमसाठी सोडणार नाहीये. जुबली हिल्स येथील 'ब्लेसींग' नावाचं ८,००० स्क्वेअर फूटचं आलिशान घर त्याचं मुख्य निवासस्थान आहे.
अल्लू अर्जूनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'राका' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली कुमार करत आहेत. 'राका' चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत दीपिका पादुकोणदेखील झळकणार आहे. अलिकडेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचे 'फर्स्ट लूक' पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने अल्लू अर्जुन आणि दीपिका ही नवीन जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
Web Summary : Allu Arjun has rented a luxurious 5-bedroom sea-facing apartment in Juhu, Mumbai, for ₹16 lakh per month. The three-year deal provides him with a home for his family near other Bollywood stars, while he continues to reside primarily in Hyderabad.
Web Summary : अल्लू अर्जुन ने मुंबई के जुहू में ₹16 लाख प्रति माह पर एक शानदार 5-बेडरूम वाला समुद्र-मुखी अपार्टमेंट किराए पर लिया है। तीन साल का सौदा उन्हें बॉलीवुड सितारों के पास अपने परिवार के लिए एक घर प्रदान करता है, जबकि वे मुख्य रूप से हैदराबाद में ही रहेंगे।