Join us

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:40 IST

समंथाची जागा कोण घेणार?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. डिसेंबर महिन्यात सिनेमात रिलीज होणार आहे. त्यामुळे रिलीजसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. 'पुष्पा' मध्ये समंथा रुथ प्रभूच्या (Samatha Ruth Prabhu) आयटम साँगने धमाल आणली होती. 'ऊँ अंटवा' या गाण्याची आजही धूम असते. मात्र आता 'पुष्पा 2' मध्ये समंथाचं आयटम साँग नसणार आहे. तिच्याजागी कोणती अभिनेत्री दिसणार?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मधील आयटम साँगसाठी दोन नावं चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरलाही यासाठी ऑफर मिळाली आहे. तर याशिवाय साऊथ अभिनेत्री श्रीलीला हिच्याही नावाची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणतंही नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.  समंथाने तर तिच्या आयटम साँगमधून रेकॉर्डच सेट केला. त्यामुळे आता जी अभिनेत्री येईल तिच्यावर नक्कीच दबाव असणार आहे. 

इतकंच नाही तर स्क्रीप्ट मोठी झाली तर 'पुष्पा'च्या सीक्वेलमधून आयटम साँगच हटवण्यात येईल अशीही एक चर्चा आहे. 2020 साली आलेल्या 'पुष्पा' सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. यातील डायलॉग्स, गाणी, अभिनय, नृत्य सगळंच जबरदस्त होतं. आता 'पुष्पा 2' कडूनही खूप अपेक्षा आहेत. 6 डिसेंबर 2024 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 

अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिकाचं पहिलं गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. 'सामी सामी' गाण्याने सध्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे. आता श्रीवल्ली गाण्याच्या व्हर्जनचीही लोकांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :पुष्पासमांथा अक्कीनेनीTollywoodअल्लू अर्जुन