दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन (allu arjun). आजच्या घडीला 'पुष्पाराज' या नावाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असलेल्या या अभिनेत्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. म्हणूनच, त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या भेटीविषयी एक किस्सा चर्चिला जात आहे. अभिनेत्याची भेट घेण्यासाठी चक्क ४२ नियमांचं पालन करावं लागतं असता दावा एका महिलेने केला आहे.
काय आहे महिलेचा दावा?
अलिकडेच कावेरी बरुआ यांनी अल्लू अर्जुनला भेटण्याविषयी भाष्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी चक्क ४२ नियमांचं पालन करावं लागतं. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं असून त्यांना आलेला अनुभवदेखील शेअर केला आहे. मात्र, त्यांची ही मुलाखत पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनच्या टीमने कावेरी यांचे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या कावेरी बरुआ?
कावेरी बरुआ यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये अल्लू अर्जुनविषय़ी भाष्य केलं. यावेळी त्यांनी अभिनेत्याला भेटण्यापूर्वी त्यांच्याकडे एक नियमावली आल्याचं सांगितलं. या नियमावलीमध्ये चक्क ४२ प्रकारचे नियम होते.
"सरांशी ( अल्लू अर्जुन) बोलतांना त्यांच्या डोळ्यात पाहायचं नाही. त्यांना हस्तांदोलन (शेक हँड) करायचं नाही, असे अनेक नियम या नियमावलीमध्ये होते. इतकंच नाही तर त्यांच्या (अल्लू अर्जुन) मॅनेजरचाही एक मॅनेजर आहे आणि त्याचाही अजून एक मॅनेजर आहे. विशेष म्हणजे तो प्रचंड मग्रूर आहे", असं कावेरी यांनी म्हटलं आहे.
अल्लू अर्जुनच्या टीमने दिलं स्पष्टीकरण
"अलिकडे अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या भेटीविषयी ज्या चर्चा होतायेत त्या पूर्णत: चुकीच्या आहेत. अल्लू अर्जुन कायम सन्मानपूर्वक आणि मर्यादेचं भान राखून वागतात. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप गंभीर असून आम्ही नक्कीच त्याची दखल घेऊ. ज्या लोकांनी अभिनेत्याविषयी हे भाष्य केलं आहे त्यांच्याविरोधात आमच्या लीगल टीमने अॅक्शन घेतली आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांविरोधात मानहानीची कारवाई सुरु होईल. तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे. कोणत्याही विषयाची खात्री न करता ती व्हायरल करणं थांबवा."
Web Summary : Actress Kaveri Barua claimed meeting Allu Arjun requires following 42 rules, including no eye contact or handshakes. Arjun's team denied these claims as false and disrespectful, threatening legal action for defamation. The team emphasized Arjun's respectful conduct.
Web Summary : अभिनेत्री कावेरी बरुआ ने दावा किया कि अल्लू अर्जुन से मिलने के लिए 42 नियमों का पालन करना पड़ता है, जिसमें आँखों का संपर्क और हाथ मिलाना शामिल नहीं है। अर्जुन की टीम ने इन दावों को झूठा और अपमानजनक बताते हुए मानहानि के लिए कानूनी कार्रवाई की धमकी दी। टीम ने अर्जुन के सम्मानजनक आचरण पर जोर दिया।