Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:31 IST

साई पल्लवीने केलेलं नवीन वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. काय म्हणाली साई बघा (sai pallavi)

साई पल्लवी ही भारताची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. साई पल्लवीला आपण विविध सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. साई पल्लवी जाहीरपणे सामाजिक,  राजकीय विषयांवर वक्तव्य करताना फारशी दिसत नाही. परंतु नुकताच साईचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तिने इंडियन आर्मी आणि पाकिस्तानी लोकांबद्दल वक्तव्य केलंय. काय आहे नेमकं प्रकरण?

साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत

२०२२ ने एका मुलाखतीत साईने पाकिस्तानी जनता भारतीय आर्मीला कोणत्या दृष्टीकोनातून पाहते याविषयी सांगितलं होतं. साई म्हणाली की, "पाकिस्तानी जनतेला वाटतं की आपल्या देशातील आर्मी ही आतंकवादी आहे. कारण आपण त्यांना त्रास देत आहोत. आणि आपल्यासाठी पाकिस्तान आर्मी तशी आहे. त्यामुळे दृष्टीकोन बदलला पाहिजे. मला हिंसा अजिबात कळत नाही." अशाप्रकारे साई पल्लवीने केलेल्या वक्तव्याने अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय.

साई पल्लवीने केलेल्या या वक्तव्यामुळे तिला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलंय. याशिवाय "काहीही न विचार करता केलेलं बेताल वक्तव्य", "आपली भारतीय सेनेने कधीही निष्पाप लोकांना मारलं नाही", असं वक्तव्य करत लोकांनी साई पल्लवीवर टीका केलीय. याशिवाय काही लोकांनी असंही सांगितलंय की, साई फक्त दृष्टीकोनाबद्दल बोलली. तिने कोणत्याही समुदायाला नावं ठेवली नाही, असं म्हणत साईच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगत लोकांनी तिला सपोर्ट केलाय.

 

टॅग्स :साई पल्लवीTollywood