Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीचा लग्नानंतर २ वर्षांतच घटस्फोट, म्हणाली, "भावनिकरित्या खचणारा होता अनुभव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:23 IST

अभिनेत्री 'व्हॅलेंटाईन डे' ला बांधली होती लग्नगाठ

सध्या मनोरंजनविश्वात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. तर दुसरीकडे एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दोन वर्षातच पतीपासून घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे तिने 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आता घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. यामुळे चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा विनोदने (Aparna Vinod) घटस्फोट जाहीर केला आहे. पती रिनील राजपासून ती लग्नाच्या दोन वर्षांनंतर वेगळी होत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. मात्र त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे जो मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. संपूर्ण विचार केल्यानंतर मी लग्न मोडत आहे. हा निर्णय अजिबातच सोपा नव्हता पण मला वाटतं पुढे जाण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी हा योग्य निर्णय आहे. लग्नाचा काळ हा माझ्यासाठी भावनिकरित्या खचणारा आणि आयुष्यातला कठीण काळ होता. म्हणून आता पुढे जाण्यासाठी मी तो चॅप्टरच बंद केला आहे."

ती पुढे लिहिले, "या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी आभार मानते. यापुढे सगळं सकारात्मक होईल अशी मी आशा करते."

अपर्णा विनोद ही अनेक तमिळ सिनेमांमध्ये दिसली आहे. 'कोहिनूर' या तमिळ सिनेमातून तिला ओळख मिळाली. २०१७ मध्ये ती थलपति विजय आणि कीर्ती सुरेशच्या 'भैरवा' सिनेमातही दिसली. २०२१ साली 'नदुवन' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती.

 

टॅग्स :सेलिब्रिटीघटस्फोटसोशल मीडिया