दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक विजय सेतुपतीवर अलीकडेच लैंगिक छळाचा आरोप लागला. या आरोपांनी चांगलीच खळबळ उडवली होती. एका महिलेने दावा केला की, विजयने तिला एका वेबसीरिजसाठी कास्टिंगच्या बदल्यात अश्लील मागणी केली होती. याशिवाय व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही वेळ घालवण्यासाठी २ लाख रुपयांची ऑफर दिली असा आरोप करण्यात आला. मात्र विजय सेतुपतीने या आरोपांना साफ नकार दिला असून हे सर्व खोटं आणि बदनामीसाठी पसरवलं गेलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाला सेतुपती?
एका मुलाखतीमध्ये विजय म्हणाला की, “जे लोक मला खरं ओळखतात, त्यांना हे सगळं हास्यास्पद वाटेल. मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. अशा खोट्या प्रचाराने मला काही फरक पडत नाही. या आरोपांमुळे माझं कुटुंब थोडं हादरलं, पण मी त्यांना शांत केलं.” विजयने हेही नमूद केलं की, “ही व्यक्ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे. हे सगळं करुन या व्यक्तीला काही मिनिटं प्रसिद्धीचे क्षण मिळत असतील, तर तिला ते अनुभवू द्या”
विजय सेतुपतींच्या वकिलांनी सायबर क्राईम विभागात यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विजयच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही त्याच्या नावावर अशाच पद्धतीने अफवा पसरवल्या गेल्या आहेत, आणि हे सर्व त्या लोकांनी केलं आहे जे त्याचं यश पाहून जळत आहेत.
विजयच्या वकिलांनी हेही स्पष्ट केलं की, सध्या विजयचा ‘थलैवान थलैवी’ या नवीन चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हे आरोप मुद्दाम या यशावर पाणी फेरण्यासाठी केले गेले आहेत. सोशल मीडियावरही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक चाहत्यांनी विजयच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. दरम्यान ज्या व्यक्तीने विजयवर हे आरोप केले