संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'स्पिरिट' हा चित्रपट सध्या सिनेसृष्टीत चांगलाच चर्चेत आहे. सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या या हाय-व्होल्टेज अॅक्शन ड्रामाबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. याआधी दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टच्या कारणाने हा सिनेमा सोडला होता. आता याच चित्रपटात झळकणारे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी अचानक एक्झिट घेतली आहे. काय घडलं नेमकं?
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रकाश राज यांच्यात एका सीनच्या चित्रीकरणावरून जोरदार वाद झाला. चित्रपटाची जी पटकथा होती त्यानुसार शुटिंग करताना दोघांमध्ये 'क्रिएटीव्ह' गोष्टींवरुन वैचारिक मतभेद निर्माण झाले. हे मतभेद इतके टोकाला गेले की, सेटवर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि प्रकाश राज यांनी तडकाफडकी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.
मेकर्सचा मोठा निर्णय
असेही बोलले जात आहे की, सेटवर प्रकाश राज ज्या प्रकारे वागत होते, त्यांचं वर्तन टीमला आवडले नव्हते, ज्यामुळे निर्मात्यांनी त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा कठोर निर्णय घेतला. प्रकाश राज या चित्रपटात एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते आणि त्यांच्या आवाजातील टीझरने आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. मात्र, आता त्यांच्या जाण्याने आधी शूट केलेले काही सीन्स पुन्हा चित्रित करावे लागू शकतात, ज्यामुळे चित्रपटाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.
दीपिका पादुकोणनंतर दुसरी मोठी एक्झिट'स्पिरिट' चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये झालेला हा दुसरा मोठा बदल आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील मानधन आणि कामाच्या वेळांबाबत झालेल्या मतभेदानंतर या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिची जागा आता तृप्ती डिमरीने घेतली आहे. 'अॅनिमल'च्या अफाट यशानंतर संदीप रेड्डी वांगा 'स्पिरिट'च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात प्रभास पहिल्यांदाच एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबतच विवेक ओबेरॉयचीही महत्त्वाची भूमिका आहे.
Web Summary : Prakash Raj exited Prabhas' 'Spirit' after a dispute with director Sandeep Reddy Vanga over creative differences during filming. This follows Deepika Padukone's earlier departure. Tripti Dimri replaced Padukone; Vivek Oberoi also stars.
Web Summary : प्रभास की 'स्पिरिट' में निर्देशक संदीप रेड्डी वांगा के साथ रचनात्मक मतभेद के बाद प्रकाश राज ने फिल्म छोड़ दी। दीपिका पादुकोण पहले ही जा चुकी हैं। तृप्ति डिमरी ने पादुकोण की जगह ली; विवेक ओबेरॉय भी हैं।