Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhanush Wedding: धनुष 'या' मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करणार? तारीखही ठरली, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:24 IST

साउथ सुपरस्टार दुसऱ्यांना लग्नगाठ बांधणार आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत धनुष लग्न करणार याची चर्चा आहे. कोण आहे ती?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणजे अभिनेता धनुष. साउथ सिनेमात काम केलेला धनुष आज हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. धनुषच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुपस्टार धनुष लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झालीये. धनुष जिच्यासोबत लग्न करणार ती मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोण आहे ती?

धनुष कोणासोबत करणार लग्न?

धनुष जिच्यासोबत लग्न करणार अशी चर्चा आहे तिचं नाव आहे मृणाल ठाकूर. 'सीता रामम' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि धनुष लग्न करणार याची चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नव्हे तर लवकरच येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे निमित्त अर्थात १४ फेब्रुवारी २०२६ ला हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय. ही चर्चा सुरु होताच नेटकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. अजून धनुष किंवा मृणालने याविषयी कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा केला नाहीये. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे आगामी काळात समजेल. 

धनुष आणि मृणालमध्ये काहीतरी शिजतंय?

काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूरच्या 'सन ऑफ सरदार २' सिनेमाच्या प्रिमिअरला धनुषने हजेरी लावली होती. यावेळी मृणाल आणि धनुष यांच्यातील जवळीक पाहून अनेक चाहत्यांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये धनुषने मृणालचा हात धरला असून दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. 

वयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, धनुष आणि मृणाल यांच्यामध्ये तब्बल ९ वर्षांचे अंतर आहे. धनुषचा जन्म १९८३ मध्ये झाला असून तो सध्या ४२ वर्षांचा आहे, तर मृणाल ठाकूर ही ३३ वर्षांची आहे. १८ वर्षांच्या वैवाहिक प्रवासानंतर रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी घटस्फोट घेतल्यापासून धनुषचे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे. दुसरीकडे, मृणालने नेहमीच आपले खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात आणणे टाळले आहे. आता हे दोघं खरंच लग्न करणार का, हे पुढील दिवसांत स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanush to Wed Marathi Actress Mrunal Thakur? Wedding Date Set!

Web Summary : South superstar Dhanush is rumored to marry actress Mrunal Thakur on Valentine's Day 2026. Speculation arose after their closeness at a premiere. Neither has confirmed the news.
टॅग्स :धनुषमृणाल ठाकूरबॉलिवूडलग्न