Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर दोनच महिन्यात अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाली,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:46 IST

अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न असून अजय देवगणसोबत तिने गेल्याच वर्षी काम केलं होतं.

मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच गरोदर राहिल्या. श्रीदेवीपासून ते इलियाना डिक्रुझ, आलिया भट यांचा समावेश आहे. आता नुकतंच आणखी एका अभिनेत्रीने लग्नाच्या दोन महिन्यातच गुडन्यूज दिली आहे. नेहमी ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बेबी बंपचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 

सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल (Amala Paul) सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी अमाला बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत लग्नबंधनात अडकली. या कपलच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर दोनच महिन्यात अमाला चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. बेबी बंपचा फोटो शेअर करत तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. 'आता मला कळलं की तुझ्यासोबत 1+1=3 होतं.' असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले आहेत. 

प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर अमालावर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसंच अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. अमाला ३२ वर्षांची असून हे तिचं दुसरं लग्न आहे. 2014 मध्ये अमाला आणि फिल्म दिग्दर्शक ए एल विजय लग्नबंधनात अडकले होते. मात्र लग्नानंतर तीनच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. नंतर अमाला जगत देसाईच्या प्रेमात पडली. त्यांचं लग्न अगदी स्वप्नवत वाटावं असं होतं. लग्नानंतर दोन महिन्यातच त्यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे सर्वचजण खूश आहेत.

गेल्या वर्षी अमाला पॉलने अजय देवगणच्या 'भोला' सिनेमात भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 

टॅग्स :अमला पॉलप्रेग्नंसीलग्नसोशल मीडिया