Join us

'उन्हाळ्यात बिअर पाजणार नाही का?' युजरच्या प्रश्नावर सोनू सूदचं हटके उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:44 IST

Sonu sood: आतापर्यंत खलनायिकी भूमिकांमुळे ओळखला जाणारा सोनू सूद कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरला.

कोरोना काळात कित्येक कुटुंबाचा आधार, तारणहार झालेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. आतापर्यंत खलनायिकी भूमिकांमुळे ओळखला जाणारा सोनू सूद कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरला. त्यामुळे आज तो जनतेचा आधार म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे कोरोनाचं संकंट संपल्यानंतरही सोनू सूदचं मदतकार्य सुरुच आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे सातत्याने मदत मागत असतात. यात काही जण काही भन्नाट मागण्याही करतात. मात्र, सोनू सूददेखील त्याच मजेशीर अंदाजात या नेटकऱ्यांना उत्तर देतो.

सोनू सूदने आतापर्यंत विविध माध्यमातून गरजूंना मदत केली आहे. यात अगदी हिवाळ्यात चादरी देण्यापासून ते पावसाळ्यात त्यांना राहण्यासाठी पक्की घरं बांधण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने केल्या. त्यामुळेच एका नेटकऱ्याने त्याला मजेशीर प्रश्न विचारला आहे.

"हिवाळ्यात चादरी दान करणाऱ्यांनो, उन्हाळ्यात थंडगार बिअर तर पाजा", अशी पोस्ट एका नेटकऱ्याने शेअर करत सोनू सूदला टॅग केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर सोनू सूदने आवर्जुन उत्तरं दिलं आहे.

"बिअरसोबत शेव चालेल का? ", असं भन्नाट उत्तर सोनू सूदने या नेटकऱ्याला दिलं आहे. सोबतच त्याने काही लाफिंग इमोजीही शेअर केल्या आहेत.दरम्यान, सोनू सूदचं हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसेलिब्रिटी