Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार दिल्यास 'हा' क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेचं करणार होता अपहरण, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:08 IST

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने तिच्या अभिनयाने, सोज्वळ चेहऱ्याने आणि गोड हसण्याने देशभरात तिचे चाहते निर्माण केले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. ९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.  सोनालीची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी व्हायची. एक क्रिकेटपटू तर तिच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता. 

कायम आपल्या प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी सोनाली, एक काळ तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत होती. सोनाली बेंद्रेसोबत लग्न करण्याची इच्छा क्रिकेटपटूने व्यक्त केली होती. तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा होता. त्याकाळी सोनाली आणि शोएबच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. अलिकडेच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये शोएब अख्तरसंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आले. 

मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, एकदा शोएब अख्तर म्हणाला होता 'सोनाली मला खूप आवडते. मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. सोनाली लग्नाला नकार देत असेल तर, तिचं अपहरण करेल'. या प्रश्नावर सोनाली म्हणाली,  'मला माहिती नाही की यामध्ये किती तथ्य आहे. कारण तेव्हा देखील अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या'.

सोनालीने यावेळी क्रिकेट बिलकूल आवडत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली, 'माझे पती आणि मुलाला क्रिकेट प्रचंड आवडतं. मी कधी क्रिकेट पाहण्यासाठी जात नाही. कारण मला ते आवडत नाही'. सोनाली मध्यंतरी बराच काळ ती सिनेसृष्टीपासून दूर होती. तिला झालेला कॅन्सर आणि यशस्वीपणे तिने त्यासाठी दिलेली झुंज यामुळे ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सोनाली बेंद्रेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ओटीटीवर पदार्पण केलं असून नुकतीच तिची 'द ब्रोकन न्यूज' ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेसेलिब्रिटीबॉलिवूडपाकिस्तानभारतशोएब अख्तर