Join us
Daily Top 2Weekly Top 5

केकेची मुलं काय करतात? संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन? जाणून घ्या गायकाच्या फॅमिलीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:48 IST

KK's death : केके...! सगळ्यांचा लाडका गायक... अचानक सर्वांना सोडून गेला. केकेच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके आता या जगात नाही, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. केकेच्या कुटुंबीयांची अवस्था  सुद्धा वेगळी नाहीये.

KK's death : केके...! सगळ्यांचा लाडका गायक... अचानक सर्वांना सोडून गेला. केकेच्या (Krishnakumar Kunnath) निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके आता या जगात नाही, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. केकेच्या कुटुंबीयांची अवस्था  सुद्धा वेगळी नाहीये. आपला पती आपल्याला एकाकी सोडून गेला, यावर पत्नी ज्योतीचा विश्वास बसत नाहीये. मुलगा नकुल कृष्णा व मुलगी तमारा यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत.  केकेनं त्याची बालपणीची मैत्रिण ज्योतीसोबत लग्न केलं होतं. केके व ज्योती यांची पहिली भेट सहाव्या वर्गात झाली होती. तेव्हापासून दोघंही सोबत होते. मी आयुष्यात एकाच मुलीला डेट केलं आणि ती माझी पत्नी ज्योती आहे, असं केके सांगायचा.

1999 साली केकेनं ज्योतीसोबत लग्न केलं. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलं उमलली. केकेला नकुल नावाचा एक मुलगा आहे आणि तमारा नावाची मुलगी आहे. तमारा व नकुल दोघांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत म्युझिकलाच करिअर म्हणून निवडलं आहे.

नकुलच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तो म्युझिशियन आणि प्रोड्यूसर असल्याचं कळतं. त्याला भटकंतीची प्रचंड आवड आहे. आपल्या कामाप्रतीही तो पॅशिनेट आहे. सोशल मीडियावर त्याची छोटीशी झलक तुम्हाला पाहायला मिळेल.

मुलगी तमारा ही सुद्धा सिंगर, म्युझिशियन व कंपोझर आहे. तमाराच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर तिच्या म्युझिक रेकॉर्डिंगचे काही फोटो आहेत.केके मुलांबद्दल फार क्चचित बोलायचा. एकदा एका मुलाखतीत तो मुलांच्या करिअरबद्दल बोलला होता. माझ्या मुलांनी माझ्यासारखं सिंगींगमध्ये करिअर बनवावं, यासाठी मी त्यांच्यावर दबाव टाकणार नाही, असं तो म्हणाला होता. नकुलने 12 वी पास केल्यानंतर लगेच म्युझिक इंडस्ट्रीत येण्याची इच्छा व्यक्त केल होती. हमसफर अल्बममधील मस्ती हे गाणं नकुलने गायलं आहे. तमारा तिच्या नव्या म्युझिक व्हिडीओची प्रतीक्षा करते आहे.

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथबॉलिवूड