कॅनेडियन गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला. पत्नी हेलीने (Hailey) गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'जॅक ब्लूज' असं ठेवण्यात आलं. मात्र आता जस्टिन आणि हेली यांच्यात सगळं काही आलबेल नसून दोघंही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. घटस्फोटानंतर हेली जस्टिनकडून ३०० मिलियन डॉलर म्हणजे २६०० कोटींची मागणी करु शकते अशीही चर्चा सुरु आहे. असं झालं तर हा सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक असेल.
जस्टिन बीबर काही वर्षांपूर्वी नशेच्या आहारी गेला होता. मात्र तेव्हा त्याला हेलीची साथ मिळाली. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांना एक मुलगाही झाला. मात्र जस्टिनची नशेची सवय अजूनही सुटलेली नाही. हे त्यांच्या बाळासाठी धोकादायक असल्याने हेलीने हा निर्णय घेतला आहे. जस्टिनच्या वाईट सवयींमुळे हेलीने स्वत:ला मुलासह त्याच्यापासून दूर केलं आहे. तसंच घटस्फोटानंतर ती मुलाची कस्टडीही घेणार आहे. या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या चर्चांदरम्यान रात्री दोघंही डिनर डेटसाठी एकत्र बाहेर पडले त्यामुळे या चर्चा खोट्या असण्याचीही शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी हॉलिवूड गायक आणि हिप हॉप आर्टिस्ट सीन डिडी कॉम्ब्सला सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणात अटक झाली होती. या केसमध्ये जस्टीन बीबरला साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. या केसमध्ये नाव आल्याने जस्टीन डिस्टर्ब आहे अशीही चर्चा आहे. त्याच्यावर लागलेले आरोप खरे सिद्ध झाले तर त्याचं करिअर संपेल अशीही त्याला भीती आहे.