Join us

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:24 IST

Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा (S) आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूड कपल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. ७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधून त्यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. लग्नाच्या फोटोंनी इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी लाईक्समध्ये आघाडीवर राहण्याचा विक्रम केला आहे. 

सिद्धार्थ आणि कियारा हे सध्या बॉलिवूडमधील सर्वात हॉट जोडपे आहेत, विकी-कतरिनाच्या, आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटोंपेक्षा त्यांच्या लग्नाच्या फोटोंना जास्त पसंती मिळाल्याचे दिसून येते. लग्नानंतर दोघांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले होते.

सिद्धार्थ-कियारानेने 7 फेब्रुवारीला लग्नाचे ३ फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंना आतापर्यंत १५ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कियाराच्या अकाऊंटवर त्याला १५ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कियाराचे २८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. सिद्धार्थ मल्होत्राही यात मागे नाही. त्याला लग्नाच्या फोटोंवर १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

कतरिनाने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोंना १२ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर कतरिनाचे सध्या इंस्टाग्रामवर ७० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आलिया भटच्या लग्नाच्या फोटोंना त्यावेळी इंस्टाग्रामवर १३ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले होते.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीआलिया भटरणबीर कपूरविकी कौशलकतरिना कैफ