Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:27 IST

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे.

आज गुढीपाडवा. हिंदू नवीन वर्षाचा आनंद सर्वजण उत्साहात साजरा करत आहेत. याच शुभमुहुर्तावर मराठी कलाकारांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. दोघांनी नवीन घरातला खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.सिद्धार्थ-मितालीने केला नवीन घरात प्रवेशसिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी नवीन घरात केलेला गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. या व्हिडीओत कलशावर मिताली स्वस्तिक काढताना दिसते. पुढे सिद्धार्थ गुढीवर साखरेच्या गाठीची माळ बांधताना दिसतो. पुढे दोघे मिळून गुढीवर कलश ठेवतात. त्यानंतर निरंजन पेटवून दोघेही गुढीची पूजा करतात. त्यानंतर सिद्धार्थ-मिताली अत्यंत आनंदात गुढीची पूजा करतात. गुढी उभारल्यानंतर दोघेही नव्या घराकडे पाहतात. एकूणच नवीन वर्षात नवं घर घेतल्याचा स्वप्रपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला दिसतोय.

सिद्धार्थ-मितालीने नेमकं कोणत्या भागात घर घेतलंय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या दोघांनी गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्यावर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी आणि सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. ''नवं वर्ष, नवं घर, नवी सुरुवात! गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!'', असं खास कॅप्शन देऊन सिद्धार्थ - मितालीने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Siddharth Chandekar and Mitali Mayekar enter new home on Gudi Padwa.

Web Summary : Siddharth Chandekar and Mitali Mayekar celebrated Gudi Padwa by entering their new home. The couple shared a video of the housewarming ceremony on social media, expressing their joy. Fans showered them with congratulations.
टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरबॉलिवूडमराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन