Join us
Daily Top 2Weekly Top 5

जया बच्चन यांचं लेकीसोबतही पटेना?; कॅमेरासमोरच झालं श्वेतासोबत भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:16 IST

Jaya Bachchan: श्वेता आणि जया बच्चन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून येतं.

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan ) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. यात बऱ्याचदा त्या पापाराझींमुळे चर्चेत येतात. जया बच्चन यांना राग पटकन येतो. त्यामुळे अनेकदा त्या पापाराझींवरही संतापल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच सध्या त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांचं आणि त्यांच्या लेकीचं श्वेताचं कॅमेरासमोर शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अलिकडेच जया बच्चन यांनी श्वेता बच्चन आणि नव्या नंदा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. 'व्हाट द हेल, नव्या' या पॉडकास्टचा नवा व्हिडीओ नुकताच अपलोड युट्यूबर अपलोड झाला आहे. या व्हिडीओमध्ये एकमेकींशी गप्पा मारता मारता अचानकपणे श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि जया बच्चन यांची शाब्दिक चकमक होते. मात्र, श्वेता हा प्रसंग सावरुन घेते.

या मुलाखतीमध्ये नव्या, जया यांच्यासोबत भारतीय महिला वैज्ञानिकांविषयी भाष्य करताना दिसत आहे. या महिलांनी कसं घर, संसार सांभाळत त्यांच्या करिअरमध्येही यश मिळवलं हे ती सांगत आहे.  यावेळी, 'त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदरभाव आहे', असं जया बच्चन सांगतात. यामध्येच श्वेताने तिचं मत मांडलं आणि तिचं आईसोबत भांडण झालं.

नेमका का झाला श्वेता-जयामध्ये वाद?

"मला असं वाटतं हे नक्कीच होऊ शकतं. वैतागू नकोस. पण, हे नक्कीच होऊ शकतं. कारण, तुम्ही एक मशीन तुमच्यासोबत नाही ना ठेऊ शकतं. तुम्हीही तशाच आहात", असं श्वेता, जया यांना उद्देशून बोलते. त्यावर, जया बच्चन सुद्धा उत्तर देतात. "हे यासाठी कारण पुरुषांच्या राज्यात त्या स्वत:ला सिद्ध करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान होतो". आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्वेता नव्याकडे पाहते आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते.

दरम्यान, या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी अभिषेक बच्चन याच्याविषयी सुद्धा भाष्य केलं. त्यामुळे सध्या हे पॉडकास्ट चांगलंच चर्चेत येत आहे.

टॅग्स :जया बच्चननव्या नवेलीबॉलिवूडसेलिब्रिटी