Join us  

"गड्या थांबायचं नाय!" सासऱ्यांनीच केली लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची सजावट, अशी होती अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:52 AM

शुभंकर एकबोटे - अमृता बाणे यांचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात नवविवाहीत दांपत्याच्या पहिल्या रात्रीसाठी शुभंकरच्या बाबांनी काय केलंय बघा (shubhankar ekbote, amruta bane)

काहीच दिवसांपुर्वी मराठमोळी अभिनेत्री अमृता बाणे आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांनी एकमेकांशी लग्न केलं. शुभंकर - अमृता गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर दोघांनी नातेवाईक, मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. शुभंकर - अमृताचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. अशातच अमृताने लग्नानंतर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. यात शुभंकरच्या बाबांनी म्हणजेच तिच्या सासऱ्यांनी लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची खास सजावट केलीय.

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओत बघायला मिळतं की, शुभंकर - अमृता एकमेकांच्या साथीने गृहप्रवेश करतात. आणि पुढे त्या दोघांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी शुभंकरच्या बाबांनी खास सजावट केलेली दिसते. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या आणि दोन चॉकलेटची पाकिटं दिसतात. आणि एक खास संदेश बोर्डवर लिहिलेला असतो. त्यावर दोघांना उद्देशून "#आशू थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही.. दे धक्का All The Best.. आजोबा तयार होऊन बसल्यात.." अशा संदेश लिहिलेला दिसतोय.

शुभंकर - अमृताबद्दल सांगायचं तर.. शुभंकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो 'चिठ्ठी', 'मंत्र', 'डार्कलाईट', 'कन्यादान', 'चौक', 'धर्मवीर' अशा चित्रपट मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. तर अमृता बाणेबद्दल सांगायचं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात न्यूज रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेत तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 'रंग माझा वेगळा', 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतून ती भेटीला आली आहे.

टॅग्स :लग्नटेलिव्हिजन