क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्हींबाबत भारतीयांमध्ये प्रचंड जिव्हाळा आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांवर रसिक जीवापाड प्रेम करतात. क्रिकेट आणि बॉलिवूड अगदी सुरुवातीच्या काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न करून सुखी संसार थाटला आहे. विराट-अनुष्का, केएल राहुल-अथिया शेट्टी यांसारखी अनेक जोडपी याचे उत्तम उदाहरण आहेत. सध्या एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव स्टार श्रेयस अय्यरशी जोडले गेले आहे. त्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगली आहे.
तर ती आहे मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर. तिचं नाव आता श्रेयस अय्यर सोबत जोडले जात आहे. रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, मृणाल आणि श्रेयस गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, या दोघांचे नाते प्राथमिक टप्प्यावर आहे आणि त्यांना ही बाब सध्या खासगीतच ठेवायची आहे. या अफेअरच्या बातम्या समोर येताच, नेटकऱ्यांनी श्रेयस आणि मृणाल यांच्या जोडीला लगेचच स्वीकारले आहे. चाहत्यांनी दोघांचीही नावे जोडून #Shreyal असा खास कपल हॅशटॅग तयार केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट केला जात आहे.
दरम्यान, याआधी मृणालचं नाव हे साऊथ सुपरस्टार धनुषही जोडलं गेलं होतं. 'सन ऑफ सरदार २' च्या स्क्रीनिंगमध्ये हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले आणि तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी शिजतंय, अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली होती. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर त्याच्या अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत असतो. आतापर्यंत त्याचे अनेक सुंदरींशी नाव जोडले गेले आहे. श्रेयस अय्यर त्रिशा कुलकर्णीला डेट करत असल्याचीही चर्चा काही महिन्यांपुर्वी रंगली होती. आता श्रेयस अय्यर आणि मृणालच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. सध्या या दोघांकडूनही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Web Summary : Cricketer Shreyas Iyer is rumored to be dating Marathi actress Mrunal Thakur. Reports suggest their relationship is in its early stages, with fans already creating the hashtag #Shreyal. Previously, Mrunal was linked to Dhanush, while Shreyas has been associated with other women.
Web Summary : क्रिकेटर श्रेयस अय्यर का नाम मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुर के साथ जोड़ा जा रहा है। खबरों के अनुसार, उनका रिश्ता शुरुआती दौर में है, और प्रशंसक पहले से ही #Shreyal हैशटैग बना रहे हैं। इससे पहले, मृणाल का नाम धनुष के साथ जोड़ा गया था, जबकि श्रेयस का नाम अन्य महिलाओं के साथ जुड़ चुका है।