Join us

श्रेयाने थायलंडमध्ये केलं नवीन वर्षाचं स्वागत; शेअर केले बीचवरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:46 IST

Shreya Bugde: श्रेया सध्या तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

चला हवा येऊ द्याची लेडी बॉस म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडे  (Shreya Bugde). उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदबुद्घी यांच्या जोरावर श्रेयाने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. विशेष म्हणजे विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला  मिळतं. सध्या श्रेयाने तिच्या धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेत थेट विदेश गाठलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रेया थायलंडला पोहोचली आहे.

श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या विदेश दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोमधून ती थायलंडला असल्याचं दिसून येतं. येथील Ko Pha Ngan या बीचवरचे काही निवड फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर मस्तपैकी झोका घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा रिलॅक्स करतानाचा हा अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. त्यामुळेच सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.

दरम्यान, श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही तिने काम केलं आहे.

टॅग्स :श्रेया बुगडेटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार