Join us
Daily Top 2Weekly Top 5

TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:05 IST

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.

TJMM : अनेक दिवसांनी बॉलिवुडमध्ये रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळणार आहे. तेही रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही फ्रेश जोडी आगामी सिनेमात बघायला मिळणार आहे. लव्ह रंजन (Luv Ranjan) दिग्दर्शित या सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर 'टीजेएमएम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'टीजेएमएम' मधुन श्रद्धा आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच एकत्र सिनेमात काम करणार आहे. सिनेमाच्या टायटलची घोषणा आज करण्यात आली आहे. तर  'तू झुठी मै मक्कार' असे लव्ह रंजन यांच्या सिनेमाचे नाव आहे.

अनेक दिवसांपासून श्रद्धा आणि रणबीरच्या जोडीची आणि या चित्रपटाची चर्चा होती. मात्र नाव जाहिर करण्यात आले नव्हते. सिनेमाच्या शूटिंग सेटवरचे फोटो व्हिडिओही व्हायरल झाले. मग 'तू झूठी मै मक्कार' हे नाव आज जाहिर करण्यात आले असून चाहते व्हिडिओला पसंती देताना दिसत आहेत.

'तू झूठी मै मक्कार' हा सिनेमा पुढील वर्षी होळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. ८ मार्च रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिनेमारणबीर कपूरश्रद्धा कपूरहिंदीहोळी 2023