Join us

Breaking TV Actress Chitra Suicide : धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची हॉटेल रुममध्ये आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 09:15 IST

Shocking! Famous Tv actress Chitra commits suicide in hotel room: ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता.

चेन्नई - मनोरंजन जगातात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. तमिळच्या मनोरंजन विश्वातील टीव्ही अभिनेत्री वीजे चित्राने आत्महत्या केल्याने तमिळ चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या 28 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती हेमंत यांच्यासोबत चित्राचा साखरपुडा झाला होता. 

ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. हॉटेलमध्ये भावी पती हेमंत यांच्यासमवेत त्या राहात होत्या. हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, शुटींगवरुन परतल्यानंतर चित्राने अंघोळीसाठी जात असल्याचं सांगितल. मात्र, खूप वेळानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. तरीही, चित्राकडून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने हेमंत यांनी हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला आढळून आला.