Join us

शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:01 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्याते येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

V Shantaram Awards: CID मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्याते येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. शिवाजी साटम यांना व्ही शांताकाम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेख दिग्पाल लांडेकर यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. ' ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने घोषित करतांना मला आनंद होत आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा.' असं त्यांनी ट्विट करत लिहिले.

टॅग्स :शिवाजी साटममराठी अभिनेतासीआयडीमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवार