Shefali Jariwala Prayer Meet: 'बिग बॉस' फेम, कांटा लगा या गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. २७ जूनच्या रात्री शेफालीचं निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. मुंबईत तिच्या पार्थिवाव अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीच्या पश्चात तिचा पती आणि कुटुंबीय आहेत. अशातच काल २ जुलैच्या दिवशी तिच्या घरी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यानचा तिच्या वडिलांचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या सोशल मीडियावर शेफाली जरीवालाच्या शोकसभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ममाराजी नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, शेफाली जरीवालाचा हारांनी सजवलेला हसरा फोटो दिसत आहे. त्याचसमोर अभिनेत्रीचे वडील सतीश जरीवाला आणि पती पराग त्यागी बसले आहेत. लाडक्या लेकीच्या निधानाच धक्क्यातून ते सावरले नाहीत. या व्हिडीओमध्ये शेफालीचे वडील ओक्साबोक्शी रडताना दिसत आहेत. तर पराग त्यागी सासऱ्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत धीर देताना दिसत आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूने दुखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीतही पराग आपल्या कुटुंबियांसाठी आधार बनून उभा राहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शेफालीच्या वडिलांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परागच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
इतक्या कमी वयात शेफालीचा अशाप्रकारे आकस्मिक मृत्यू होणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. शेफालीच्या मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. शेफालीचा जीव ती घेत असलेल्या अॅंटी-एजिंग ट्रिटमेंटमुळेही गेला असल्याचं बोललं जात आहे.