Join us

शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'त्या' एका वाक्याने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:30 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींना जगभरातील त्यांचे समर्थक आणि राजकीय नेते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत. नरेंद्र मोदींचे बॉलिवूडच्या सेलिब्रिटींशी सुद्धा खास संबंध आहेत. अनेक कलाकारांशी मोदींचं मैत्रीपूर्ण नातं आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या वाढदिवशी लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

शत्रुघ्न सिन्हांची पोस्ट चर्चेत

शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना X वर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन मोदींना शुभेच्छा देताना शत्रुघ्न सिन्हांनी एक इंग्रजी ओळ वापरली आहे. ते लिहितात, ‘Once a friend, always a friend indeed’, ज्याचा मराठीत अर्थ होता, ‘एकदा जो मित्र बनतो, तो खऱ्या अर्थाने नेहमीच मित्र राहतो.’ अशाप्रकारे शत्रुघ्न सिन्हांनी खास शब्दात नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. शत्रुघ्न यांनी एका ओळीत लिहिलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर आता 'शॉटगन' म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ कलाकार मनोज जोशी, परेश रावल, जॅकी श्रॉफ, प्रसिद्ध गीतकार आणि लेखक मनोज मुंतशिर यांच्यासह अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदींना आपापल्या शैलीत सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना केली आहे. अशाप्रकारे पंतप्रधान मोदी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हापी. एम. नरेंद्र मोदीनरेंद्र मोदीबॉलिवूड