Join us  

Shama Sikander ने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो, फॅन्सची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:26 PM

Shama Sikandar Hot Photo goes viral : शमा सिकंदरने एका हॉट फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शमाचा हा किलर लूक पाहून फॅन्स फिदा झाले आहेत.

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करून फॅन्सची झोप उडवत असते. यावेळीही तिने असंच काही केलं आहे. शमा सिकंदरने एका हॉट फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शमाचा हा किलर लूक पाहून फॅन्स फिदा झाले आहेत.

फोटोमध्ये बघितलं जाऊ शकतं की, शमा पिंक कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे. कॅमेरासमोर तिने बोल्ड अंदाजात पोज दिली आहे. आपल्या बोल्ड अदांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी शमा पुन्हा एकदा या फोटोमुळे चर्चेत आली आहे. हा फोटो शमाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

शमा सिकंदरने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'केवळ आत्म्याला माहीत आहे की, प्रेम काय असतं?'. शमाच्या या पोस्टवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, सुंदर फोटो आणि तू नेहमीसारखी सुंदर दिसत आहे. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, तेरी झलक श्रीवल्ली. 

शमा भलेही अलिकडे कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसली नसली तरी २००३ मध्ये तिने 'ये मेरी लाइफ है' मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळवली होती. यात तिने पूजा मेहताची भूमिका साकारली होती. त्यात ती फार साधी मुलगी दाखवली होती. पण प्रत्यक्षात मात्र शमा फारच बोल्ड आणि बिनधास्त आहे.  

टॅग्स :शमा सिंकदरटेलिव्हिजनसोशल मीडिया