Join us

'जवान' चित्रपटानंतर आता 'डंकी' ची सोशल मीडियावर क्रेझ, शाहरुख 21 वर्षांनी लहान 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 18:36 IST

'जवान'च्या शानदार यशानंतर शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

अभिनेता शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. एटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. जवान आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. 'जवान'च्या शानदार यशानंतर शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी'  हा शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 2023 हे शाहरुख खानचं वर्ष आहे, असे म्हटलं तर  चुकीचं ठरणार नाही. 'पठाण' आणि 'जवान' च्या ब्लॉकबस्टरनंतर आता राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात शंका नाही. 

डंकी हा चित्रपट तीन महिन्यांनंतर म्हणजेच 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार असल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. शिवाय 'डंकी' चित्रपटात शाहरुख पहिल्यांदा तापसी पन्नूसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तापसी शाहरुखपेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. या दोन्ही स्टार्सना पहिल्यांदाच दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी खास ट्रिट असणार आहे.

शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीसोबत काम करणार आहे. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट एक इमोशनल-कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल.  राजकुमार हिराणी यांनी '3 इडियट्स', 'पीके', 'संजू', 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता 'डंकी' या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :शाहरुख खानराजकुमार हिरानीबॉलिवूडसिनेमा