Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या बादशाहने पत्नी गौरीला ३४ वर्षांपूर्वी दिलं होतं खास गिफ्ट, पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:18 IST

गेल्या ३४ वर्षांपासून दोघेही सोबत आहेत आणि आजही त्यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी अनेकांसाठी आदर्श आहे. गेल्या ३४ वर्षांपासून हे सोबत आहेत आणि आजही त्यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. एकीकडे बॉलिवूमध्ये घटस्फोटाची प्रकरणं कानावर येत असताना शाहरुख गौरीचं नातं मात्र चिरतरुण आहे. जेव्हा शाहरुख हा केवळ एक साधारण माणूस होता तेव्हापासून गौरी त्याच्यासोबत आहे. शाहरुखच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त गौरी खानला सर्वात पहिलं गिफ्ट कोणतं दिलं असा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर शाहरुखचं उत्तर खूपच खास आहे. 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. #asksrk मधूव त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त चाहत्याने शाहरुखला विचारले, 'गौरी मॅडमला व्हॅलेंटाईनसाठी सर्वात पहिलं कोणतं गिफ्ट दिलं होतं?'

यावर शाहरुख म्हणाला, 'जर मला आठवत असेल तर या गोष्टीला आता ३४ वर्ष झाली आहेत. बहुतेक मी तेव्हा गौरीला प्लॅस्टिकचे कानातले गिफ्ट केले असावे.'

याशिवाय आणखी एका चाहत्याने शाहरुखला व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्व फॅन्सकडून काय गिफ्ट हवं असं विचारलं. 

या ट्विटवर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही मला आधीच गिफ्ट दिलं आहे. पठाणला दिलेलं प्रेम माझ्यासाठी गिफ्टच आहे.'

शाहरुख खान सध्या आगामी 'जवान'सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्याचा डंकी हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेशाहरुख खानगौरी खानबॉलिवूड