Join us

शाहरुखच्या लेकीचा थाट न्यारा, कोटींचं घड्याळ घालून 'केसरी २' पाहण्यासाठी पोहचली सुहाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:15 IST

"केसरी २" पाहण्यासाठी सुहाना कोटींचं घडळ्याळ घालून पोहचली होती. 

Suhana Khan Luxury Watch: "केसरी २" (Kesari 2) हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका आहेत. या कोर्टरूम ड्रामामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित कथा आहे. काला या चित्रपटाचा प्रिमियर पार पडला. या प्रिमियर सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या लेकीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. "केसरी २" पाहण्यासाठी सुहाना कोटींचं घडळ्याळ घालून पोहचली होती. 

 शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. "केसरी २"च्या स्क्रिनिंगमध्ये सुहाना खान ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने काळ्या रंगाचा एक लांब ड्रेस घातला होता. यासोबतच अभिनेत्रीने मॅचिंग हील्स देखील परिधान केल्या. सुहानाच्या लूकपेक्षा तिच्या घड्याळाची जास्त चर्चा होत आहे. खरंतर त्या अभिनेत्रीने हातात करोडो रुपयांचे घड्याळ घातलं होतं.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सुहाना खानचे हे घड्याळ रिवर्सो ट्रिब्यूट नॉनेंटिएम 'एनामेल' आहे. त्याची किंमत सुमारे १.४ कोटी रुपये आहे.  केवळ सुहानाच नाही तर तिचे वडील शाहरुख खानयाच्याकडेही अनेक लग्झरी घड्याळे आहेत. त्यापैकी एकाची किंमत ४ कोटी रुपये आहे आणि दुसऱ्याची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सुहानाने 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता ती लवकरच तिचे वडील शाहरुखसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडअनन्या पांडेअक्षय कुमार