Join us

मुलांच्या गॅदरिंगमध्ये शाहरुख-सैफने वेधलं लक्ष, चाहत्यांना आली 'कल हो ना हो' ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 17:10 IST

शाहरुख-सैफचा व्हिडिओ पाहिलात का?

मुंबईतील धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये नुकतंच गॅदरिंग झालं. या गॅदरिंगला अर्ध बॉलिवूड अवतरलं होतं. कारण बड्या कलाकारांची मुलं याच शाळेत शिकतात. अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्वर्या, शाहरुख खान, करीना-सैफ, शाहीद कपूर हे सगळे या फंक्शनमध्ये उपस्थित होते. यांच्या मुलांनी स्टेजवर परफॉर्मन्स दिला. दरम्यान कलाकारांचीही आपापसात चर्चा सुरु होती. शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मागेच सैफ अली खान (Saif Ali Khan) बसला होता. दोघांच्या चिटचॅटने लक्ष वेधून घेतलं. त्यांना पाहून चाहत्यांना 'कल हो ना हो'ची आठवण आली.

२००३ साली आलेला 'कल हो ना हो' सिनेमा आजही सर्वांचा आवडीचा आहे. नुकताच हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. इतक्या वर्षांनी रिलीज केल्यानंतरही सिनेमाला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सिनेमातील सैफ-शाहरुखची मैत्री खूप खास होती. '६ दिन लडकी इन' हा त्यांचा डायलॉगही गाजला होता. तेच चित्र नुकतंच धीरुभाई अंबानी शाळेत दिसून आलं. मागे बसलेल्या सैफ अली खानकडे बघत शाहरुख गप्पा मारत होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओमुळे 'कल हो ना हो'च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. दोघांना पुन्हा स्क्रीनवर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. शाहरुखचा मुलगा अबराम आणि सैफ अली खानची दोन्ही मुलं तैमुर आणि जेह याच शाळेत शिकत आहेत. त्यांच्या मुलांमध्येही चांगली मैत्री आहे.

टॅग्स :शाहरुख खानसैफ अली खान बॉलिवूडसोशल मीडिया