Join us

Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:31 IST

Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि शाहरुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि शाहरुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव फैजान खान असल्याचं सांगण्यात येत आहे. शाहरुखला धमकी दिल्यानंतर त्याने फोन बंद केल्याचं सांगण्यात आलं.

धमकी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानने आजतकशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने वेगळाच दावा केला आहे. २ नोव्हेंबरला आपला फोन चोरीला गेल्याचे फैजानने सांगितलं आहे. सलमान खाननंतर शाहरुखला धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कॉल ट्रेस केला आणि हा कॉल रायपूरमधून केल्याचं समजलं. पोलिसांनी रायपूर गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी फैजान खानची रायपूरमध्ये चौकशी केली. जेथे फैजानने सांगितलं की, पाच दिवसांपूर्वी त्याचा फोन चोरीला गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२१ वाजता शाहरुख खानच्या नावाने वांद्रे पोलिसांना धमकीचा कॉल आला होता. "शाहरुख खान मन्नत बँड स्टँड वाला आहे ना... जर त्याने मला ५० लाख रुपये दिले नाहीत तर मी त्याला मारून टाकेन" असं कॉलरने सांगितलं. पोलिसांनी फोन करणाऱ्याला त्याची ओळख विचारली तेव्हा "माझं नाव काय आहे याने काही फरक पडत नाही... जर तुम्हाला नाव लिहायचं असेल तर मेरा नाम है हिंदुस्तानी..." असं धमकी देणाऱ्याने म्हटलं होतं. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडगुन्हेगारीमुंबई पोलीस