Join us

प्रियांकाचा पती निक जोनास आहे Gay? एक्स गर्लफ्रेंडने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:09 IST

Nick jonas: २०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं.

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra).  उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडसहहॉलिवूडमध्येही तिची चर्चा रंगत असते. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत  (nick jonas) लग्न केलं असून काही दिवसांपूर्वीच ही जोडी सरोगसी पद्धतीने एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहे. मात्र, आता या चर्चांमध्ये निकच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 

२०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं. यात अभिनेत्री सेलेना गोमेझचाही (selena gomez) समावेश आहे. याच सेलेनाने एका मुलाखतीत निक समलैंगिक असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

२००८ मध्ये निक आणि सेलेना एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. या ब्रेकअपनंतर सेलेनाने होस्ट अँडी कोहेन या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिला निकच्या लैंगिकतेविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याचं तिने मजेशीर उत्तर दिलं.

निक जोनास, दिवसेंदिवस अधिक हँडसम होताना दिसत आहे. निकने अलिकडेच ‘स्क्रीम क्वीन्स’ आणि ‘किंगडम’मध्ये ‘गे’ची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेनंतर त्याने गे व्हावं असं सगळ्या समलैंगिक लोकांना वाटतंय. अर्थात, मला तसं काही वाटत नाही. पण जर निकला गे म्हणून १० पैकी गुण द्यायचे असतील तर तू किती देशील?", असा प्रश्न अँडीने सेलेनाला विचारला. 

“मी त्याला डेट केलं आहे. त्यामुळे त्याला शून्य गुण देणं पसंत करेन", असं उत्तर सेलेनाने दिलं. दरम्यान, उत्तमरित्या सेलेनाने या प्रश्नाचं उत्तर देत अँडीची बोलती बंद केली. सेलेना आणि निक यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. 

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्राबॉलिवूडहॉलिवूडसेलेना गोमेझ