Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:36 IST

ओंकार भोजनेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची कमेंट करुन नाराजी. वाचा सविस्तर (onkar bhojane)

ओंकार भोजने हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता. काही महिन्यांपुर्वी ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडला. पुढे तो फू बाई फू मध्ये झळकला. याविषय अलीकडेच तो विविध सिनेमांमधून अभिनय करत राहिला. ओंकार सध्या निलेश साबळेसोबत "हसताय ना हसायलाच पाहिजे" या शोमध्ये झळकत आहे. या शो नुकताच सुरु झाला असून शोच्या पहिला एपिसोड पाहून प्रेक्षकांनी ओंकारवर नाराजी व्यक्त केलीय.

ओंकार भोजनेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' मध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय. कलर्स मराठीच्या पेजवर लोकांनी याविषयी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, "तुझं असं बाई बनून काम करणं नाही आवडलं मित्रा. निलेश साबळे फक्त हेच करून कॉमेडी करू शकतो असं खूप लोकांचा समज आहे आणि मलाही वाटतंय की ते खरंच आहे. CHYD पासून तेच तेच चालू आहे. आणि ह्या कार्यक्रमातून आम्हा प्रेक्षकांना वेगळ्या अपेक्षा होत्या आणि त्या काही पूर्ण होताना दिसत नाहीत. बेस्ट ऑफ लक. जमलं तर हास्य जत्रा मध्ये परत ये."

आणखी एका युजरने कमेंट केलीय की, "ओंकार ला अजिबात शोभत नाही हे असेल रोल. हास्यजत्राचा तो तारा होता, इथं बल्ब ही वाटतं नाही." आणखी एका युजरने कमेंट केलीय की, "सगळी ॲक्टिंग तुझी हास्यजत्रा मध्कीच आहे ओंकार. काहीतरी वेगळं करायला हास्यजत्रा सोडलीस. आणि आता तेच तेच करतोयस ते पण आता नको ते रोल करून." अशाप्रकारे ओंकारच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय. २७ एप्रिलपासून 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शो कलर्स मराठीवर सुरु आहे.

 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठीमराठी अभिनेतानिलेश साबळेचला हवा येऊ द्या