'तुंबाड' (tumbbad) सिनेमा आजही पाहिला तर सर्वांच्या काळजाचा थरकाप उडतो. याचाच परिणाम म्हणजे जेव्हा 'तुंबाड' पुन्हा रिलीज झाला होता तेव्हा सिनेमाने चांगली कमाई केली. अशातच 'तुंबाड'पेक्षाही भयानक दिसत असणाऱ्या आगामी 'छोरी २'चा (chhorii 2) ट्रेलर रिलीज झाला आहे. नुसरत भरुचा (nusrat bharucha( आणि सोहा अली खान (soha ali khan) यांची प्रमुख भूमिका असलेला हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सोहा अली खानचं अनेक दिवसांनी बॉलिवूडमध्ये होणारं कमबॅक सुखावह आहे. जाणून घ्या 'छोरी २'च्या ट्रेलरबद्दल
'छोरी २'चा ट्रेलर
"एक राजा होता. त्याला मुलगा हवा होता पण झाली मुलगी.. मग पुढे?" अशा वाक्यांनी सिनेमाची सुरुवात होते. पुढे एका वाड्यात नुसरत भरुचाला कैद केलं जात. सोहा अली खान या वाड्यात भूतनी म्हणून वावरत असतात. मग पुढे या भयावह चक्रव्यूहातून नुसरत स्वतःला कशी बाहेर काढते, याची कहाणी 'छोरी २'च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत जे पाहून घाबरायला होतं. रहस्यमय आणि उत्कंठावर्धक वातावरण निर्माण करण्यात 'छोरी २'चा ट्रेलर यशस्वी झाला आहे.
कधी अन् कुठे बघाल 'छोरी २'
विशाल फुरिया दिग्दर्शित 'छोरी २' सिनेमा ११ एप्रिलला प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात नुसरत भरुचा, सोहा अली खान, गश्मीर महाजनी, पल्लवी अजय या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. विशाल फुरिया यांच्यासह अजित जगताप यांनी सिनेमाच्या लेखनाची धुरा सांभाळली आहे. भूषण कुमार आणि टी सीरिजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'छोरी'चा पहिला भाग चांगलाच गाजला होता. आता दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.