Join us

१७ वर्षे मोठ्या साऊथ हिरोसोबत लग्न करणार अभिनेत्री सायशा सहगल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 11:05 IST

दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

ठळक मुद्देसायशा ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. सायशाने तेलगू चित्रपट ‘अखिल’मधून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.

दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. होय, येत्या मार्च महिन्यात साऊथ अभिनेता आर्यासोबत सायशा लग्नगाठ बांधणार आहे. ‘गजनीकांत’ या साऊथ चित्रपटात आर्या व सायशा यांनी एकत्र काम केले. याच चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला असून येत्या ९ व १० मार्चला सायशा व आर्या दोघेही सहजीवनाच्या आणाभाका घेणार आहेत.आर्या हा सायशापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे. मात्र दोघांच्याही कुटुंबानी हे नाते मान्य केले आहे. हैदराबादेत हा शाही विवाह सोहळा होणार असून यानंतर चेन्नई ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे.

सायशा ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. सायशाने तेलगू चित्रपट ‘अखिल’मधून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

सायशा व आर्या दोघेही सध्या सूर्या-केवी आनंद दिग्दर्शित ‘कप्पन’ या चित्रपटात बिझी आहे. सायशाचा होणारा नवरा आर्या साऊथचा एक लोकप्रीय अभिनेता आहे. याशिवाय चेन्नईतील एका अलिशान हॉटेलाचा मालक आहे. त्याची ‘द शो पीपल’ नामक एक प्रॉडक्शन कंपनीही आहे. या कंपनीद्वारे नवीन टॅलेंटला संधी दिली जाते. सध्या आर्याकडे मगामुनी, 3 देव, संदना देवन असे बिग बजेट सिनेमे आहेत. कलभा कधलन, माय कन्नाडी, सर्वम, राजा रानी, जीवा अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.

टॅग्स :सायशा सहगलदिलीप कुमारसायरा बानू