Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान आणि करीनाच्या लग्नावेळी अमृता सिंहची कशी झाली होती अवस्था? सारा खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:00 IST

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी सारा ही १६-१७ वर्षांची होती

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) कायमच तिच्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती नेहमी तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी उघडपणे सांगताना दिसते. सारा लहान असताना तिचे आई-वडील सैफ अली खान (saif ali khan) आणि अमृता सिंग (amrita singh ) दोघे विभक्त झाले होते. अमृता सिंगबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफने करीना कपूरशी (kareena kapoor ) लग्न केले होते. सैफ अली खानच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर अमृता सिंगची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये सारा अली खानने केले होता. 

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी सारा ही १६-१७ वर्षांची होती. सैफच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळालं, तेव्हा अमृता रागावल्या किंवा चिडल्या नव्हत्या. तर उटल त्यांनी साराला "तू लग्नात काय परिधान करणार आहेस?" असा प्रश्न विचारला होता. साराने सांगितलं की, तिने सर्वात आधी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना फोन केला होता. त्यावेळी ती त्यांना म्हणाली होती की, 'सैफच्या लग्नावेळी सारा ही सर्वात सुंदर दिसावी'.

सैफच्या लग्नात साराच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. तिने खूप सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला होता. सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नासाठी साराला पाठवण्याबद्दल अमृता सिंगचेही खूप कौतुक झाले होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला जाणे, माझ्यासाठी इतके सोपे नव्हते. पण हे सर्व आईमुळे शक्य झाल्याचं साराने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीनाशी लग्न करण्याापूर्वी सैफने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगबरोबर केले होते. ते १९९१ मध्ये विवाहबद्ध झाले. सैफ आणि अमृता यांच्या वयात १२ वर्षाचे अंतर होते. तरी देखील त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.पण काही कारणांमुळे त्यांच्याच मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहे. तर करीना आणि सैफला दोन मुलं असून तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नाव आहेत. 

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगसैफ अली खान करिना कपूरलग्नघटस्फोट