Join us

स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:39 IST

सुपरस्टार असूनही अभिनेत्रीने साधेपणा जपलाय. यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत.

Sara Ali Khan: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते. साराने अल्पावधीत मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. साराने विकी कौशल, कार्तिक आर्यन, सुशांत सिंग राजपूत अशा विविध सुपरस्टार्ससोबत काम केलंय. सारा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. 

सारा ही स्टार असली, यश मिळवलं असलं तरी तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. अनेकदा ती असं काही करून जाते की सगळ्यांचे लक्ष वेधलं जातं. नुकतंच सारा झारखंडमध्ये (Sara Ali Khan Spotted In Khunti Jharkhand) एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी रांची विमानतळावरून राउरकेला रस्त्याने जात होती. तेव्हा प्रवासात भूक लागल्यानंतर ती रांची-खुंटी मुख्य रस्त्यावर असलेल्या एका छोट्याश्या ढाब्यावर अर्धा तास थांबली.

जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली, तेव्हा कोणालाही लक्षात आले नाही की ती कुणी सामान्य मुलगी नसून सारा अली खान आहे. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर, थोड्याचवेळात काही लोकांनी तिला ओळखलं आणि गर्दी जमली.  प्रत्येकाला तिच्यासोबत फोटो काढायचा होता. यावेळी सारानं कुणालाही निराश केलं नाही आणि सर्वांना भेटून सेल्फी काढले. तिच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिची प्रमुख भूमिका असलेला 'स्काय फोर्स' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. साराच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय सारा 'मेट्रो.. इन दिनो' या खास सिनेमात दिसणार आहे. गाजलेल्या 'लाईफ इन अ मेट्रो' सिनेमाचा हा पुढचा भाग असणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानसेलिब्रिटीबॉलिवूडझारखंड